घरमहाराष्ट्रअखेर तुळशी तलावही भरून वाहू लागला; चार दिवसांत तीन तलाव 'ओव्हरफ्लो'

अखेर तुळशी तलावही भरून वाहू लागला; चार दिवसांत तीन तलाव ‘ओव्हरफ्लो’

Subscribe

दोन तलाव म्हणजे मोडकसागर व तानसा हे मुंबई बाहेरील जिल्ह्यात असून तुळशी हा तलाव मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे

मुंबई -: मुंबई व ठाणे जिल्हा परिसरात सध्या चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे सात तलावांपैकी सर्वप्रथम मोडक सागर तलाव १३ जुलै रोजी दुपारी १.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यानंतर तानसा तलावही १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरून वाहू लागला. आज ‘संकष्टी चतुर्थी’ दिनी म्हणजे शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास तुळशी तलावही भरून वाहू लागला आहे.

तुळशी तलाव गेल्या वर्षी म्हणजेच १६ जुलै २०२१ रोजीच भरुन वाहू लागला होता. तर २०२० मध्ये २७ जुलै रोजी आणि २०१९ मध्ये १२ जुलै रोजी, २०१८ मध्‍ये ९ जुलै रोजी, २०१७ मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. अवघ्या ४ दिवसांत सात पैकी तीन तलाव भरून वाहू लागले आहेत. तसे म्हटले तर मुंबई व तलाव परिसरात खरे तर ९ जूनपासून पावसाळा सुरू झाला. त्यामुळे फक्त सव्वा महिन्यांच्या कालावधीत सात पैकी तीन तलाव भरून वाहू लागले आहेत. यामध्ये, दोन तलाव म्हणजे मोडकसागर व तानसा हे मुंबई बाहेरील जिल्ह्यात असून तुळशी हा तलाव मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे.

- Advertisement -

तसेच, मध्य वैतरणा तलावांत सध्या १,५७,८१८ दशलक्ष लिटर (८१.५५) इतका पाणीसाठा जमा झाला असून या तलावांत मुसळधार पावसाची बरसात सतत सुरू राहिल्यास हा तलावही लवकरच भरून वाहू लागेल. अद्यापही पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत ओढवणारे ‘पाणी कपातीचे संकट’ जवळजवळ टळणार आहे, असे म्हणायला हरकत नसावी. वास्तविक, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वात कमी पाणी साठवण क्षमता असलेले तुळशी व विहार हे दोन तलाव मुंबई पूर्व उपनगर परिसरात आहेत. तर, उर्वरित पाच महत्वाचे तलाव हे ठाणे, पालघर व नाशिक जिल्हा परिसरात आहेत.

मात्र या सात तलाव मिळून जो एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका जमा होणाऱ्या पाणीसाठयापैकी सर्वात जास्त क्षमता म्हणजे ५० टक्केपॆक्षाही जास्त पाणीसाठवण क्षमता असलेला भातसा तलाव लवकरात लवकर भरणे जास्त महत्वाचे आहे. सध्या तलावांत ११,३८,०९७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका होणारा दैनंदिन पाणीपुरवठा पाहता सदर पाणीसाठा हा पुढील ६ मे २०२३ पर्यन्त पुरेल इतका असल्याचे समोर येते.

- Advertisement -

सात तलावातील पाणीसाठा व टक्केवारी -:
———————————————————-
तलाव पाणीसाठा टक्केवारी
दशलक्ष लि.
————- ———— —————————-
उच्च वैतरणा १,५१,६९९ ६६.८१

मोडकसागर १,२८,९२५ १००.००

तानसा १,४३,८८७ ९९.१८

मध्य वैतरणा १,५७,८१८ ८१.५५

भातसा ५,२९,४९४ ७३.८४

विहार १८,३१३ ६६.१२

तुळशी ७,९६१ ९८.९४
———————————————————-
एकूण ११,३८,०९७ ७८.६३

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -