Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबई सोडून गेलेल्यांना परत आणण्यासाठी कायद्यात बदल करू - एकनाथ शिंदे

मुंबई सोडून गेलेल्यांना परत आणण्यासाठी कायद्यात बदल करू – एकनाथ शिंदे

Subscribe

मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये आणि मुंबईतून जी मराठी माणसं बाहेर गेली आहेत. या मराठी नागरिकांना मुंबईत परत आणण्यासाठी पुनर्विकासाच्या थांबलेल्या प्रकल्प कायद्यातही बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये आणि मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसांना मुंबईत परत आणण्यासाठी पुनर्विकासाच्या थांबलेल्या प्रकल्पात आणि कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातील मराठी भाषिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. (We will change the law to bring back those who left Mumbai Says CM Eknath Shinde)

मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे होणाऱ्या या संमेलनात जगभरातील आणि देशातील मराठी भाषिक उपस्थित होते. या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात आले. जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी या ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

“मुंबई आणि महाराष्ट्र मिळवताना १६६ हुतात्म्यांनी बलिदान दिले असून, त्याची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची आणि मराठी भाषिकांची पीछे हाट होणार नाही. मुंबईवर मराठी ठसा आणि मुंबईतला मराठी टक्का कायम राहावा यासाठी राज्य सरकार नेहमी प्रयत्नशील राहील. मुंबईत मराठी माणसाला ताट मानेने जगता आले पाहिजे आणि त्याचा सन्मान राहिला पाहिजे यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने प्रयत्न केले”, या संमेलानात भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने जगभरात सगळीकडे यशाची शिखरे गाठतोय. जगाच्या कोणत्याही कान-कोपऱ्यात गेलो तरी, मराठी भाषा कानावर पडते. आपला मराठी माणून जगभरातील विभिन्न क्षेत्रामध्ये काम करत आहे. आपल्या देशासाठी एक अभिमानाची बाब आहे. परदेशात नोकरी करण्यापासून ते उद्योग करण्यापर्यंत अनेक क्षेत्रात मराठी माणूस पुढे जातोय. प्रगतीची विविध शिखर गाठतोय. मराठी भाषिकांसाठी अनेक सोयी-सुविधा सुरू केल्या जातील”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

जगातील मराठी भाषिकांना एकत्र करण्यासाठी गेली वीस-पंचवीस वर्षे खासगी संस्था साहित्य-सांस्कृतिक संमेलने घेत आहे. अशातच आता शासनानेही विविध देशांतील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी विश्व संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वैश्विक मराठी संमेलने होत आहे.


हेही वाचा – जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी दोन विश्व मराठी संमेलने, एकाचे आज उद्घाटन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -