मुंबईतील वाडिया रुग्णालयात भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील वाडिया रुग्णालयात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. रुग्णालयात पहिल्या मजल्यावरील बंद ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर पाण्याचे ६ टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका वापरात नसलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली असून लेव्हल दोनची ही आग आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीविताहानी झालेली नाही. परंतु अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर ६ पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी आग लागली होती. त्याच्या बाजूला वॉर्ड देखील आहेत. त्यामुळे या वॉर्डमधील रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये, यासाठी त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगीचा आढावा घेतला आहे. शिंदेंनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली. त्यानंतर ही आग नियंत्रणात असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.


हेही वाचा : राज्यातल्या 271 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, निवडणुकीतही भाजपाच नंबर वन