घरमहाराष्ट्रआधी ५० खोके, आता ५ कोटी दिले; चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक दावा

आधी ५० खोके, आता ५ कोटी दिले; चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक दावा

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र आणि आसाममधील गुवाहाटी यांच्यात वेगळं राजकीय नातं निर्माण झालं आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर गुवाहाटीवरून सर्व सूत्र हलली होती.आता पुन्हा एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शनही घेऊन आले. मात्र, यादरम्यान शिवसेना ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. आमदारांची नाराजी दूर करण्याकरता हा गुवाहाटी दौरा आयोजित केला होता. तसंच, या नाराज आमदारांना ५ कोटी दिल्याचा दावा केला आहे. ५० खोके घेऊन आमदारांनी शिवसेनेत फूट पाडली, असा आरोप करण्यात आला होता. आता ५ कोटीचा आरोप केला जातोय.

हेही वाचा – महिला मुख्यमंत्री : नव्या घोषणेतून उद्धव ठाकरे यांचा कोणावर निशाणा?

- Advertisement -

शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार केव्हाही फुटू शकतात. त्यामुळे त्यांना गुवाहाटीला नेण्यात आले होते. नाराज आमदार फुटू नये याकरता प्रत्येक आमदाराला पुन्हा ५ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एका उद्योगपतीनेच ही माहिती दिली असल्याचंही खैरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सूरतमार्गे ते गुवाहाटीला गेले होते. तिथून सर्व सूत्र हालत होती. यादरम्यान, कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गोव्यामार्गे महाराष्ट्रात परतले होते. एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड यशस्वी होऊन राज्यात भाजपा-शिंदे गटाचं सरकार सत्तेवर आलं. त्यामुळे एकनाथ शिंदे २१-२२ नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीला जाऊन आले. केलेला नवस पूर्ण झाल्याने नवस फेडण्याच्या निमित्ताने ते गुवाहाटीला गेले असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, यादरम्यान शिवसेना ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. आमदारांची नाराजी दूर करण्याकरता हा गुवाहाटी दौरा आयोजित केला होता. तसंच, या नाराज आमदारांना ५ कोटी दिल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -