घरमहाराष्ट्रCoronaVirus: धुळ्यात कोरोना व्हायरस तपासणीची पहिली लॅब कार्यान्वित

CoronaVirus: धुळ्यात कोरोना व्हायरस तपासणीची पहिली लॅब कार्यान्वित

Subscribe

प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १.८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसच्या तपासणीस सुरुवात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारे कोरोना व्हायरसची तपासणी करणारी ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा ठरली आहे.

प्रयोगशाळेसाठी २०० स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्ती यांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या योजनेंतर्गत धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ही प्रयोगशाळा स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १.८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या प्रयोगशाळेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील २०० स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेचे ‘COVID 19’ चाचणी प्रयोगशाळा, असे नामकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

एका वेळी ९२ नमुन्यांची तपासणी

पहिल्या दिवशी चार, तर दुसऱ्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एका वेळीस ९२ नमुन्यांची तपासणी करता येणे शक्य असून या चाचणीसाठी सध्या आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे केवळ ८ तासांत रिपोर्ट समजण्यास देखील मदत होणार आहे. धुळ्यातच ही सुविधा प्रथम उपलब्ध झाल्याने वेळेसोबत पैशांची बचत होईल. कोरोना व्हायरस तपासणीचे वैद्यकीय महाविद्यालयात ४०० कीट उपलब्ध आहेत. कोरोना व्हायरससंबंधित नमुने तपासणीमुळे रुग्णांना रिपोर्ट मिळण्यास कमी कालावधी लागणार असून रुग्णांवर औषधोपचारही तातडीने मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूरात महिनाभरात तपासणी लॅब उभारणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -