घरमहाराष्ट्रभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

Subscribe

भाजपचे जळगाव जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. ते विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांचे पती होते. हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानंतर त्यांना कुटुंबियांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थीदशेपासूनच उदय वाघ भाजपचे कार्यकर्ते

उदय वाघ हे अमळनेर तालुक्यातील डांगरी गावाचे मुळचे रहिवासी होते. ते विद्यार्थीदशेपासूनच विद्यार्थी परिषदेचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रीय कार्यकर्ते होते. अमळनेर तालुक्यात पक्षसंघटनेसाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सुरुवातीला ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. त्यानंतर ते गिरीश महाजन यांच्या गटातील महत्त्वाचे नेते बनले. त्यांनी भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वेळा कार्यभार सांभाळला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत वादविवाद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisement -

सरपंच ते जिल्हाध्यक्ष थक्क करणारा प्रवास

उदय वाघ डांगर गावाचे सरपंच होऊन गेले आहेत. सरपंच झाल्यापासून त्यांचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला. दरम्यान, ते एक उत्कृष्ठ पत्रकार देखील होते. सरपंच असताना त्यांनी ४२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याप्रती वेगळा आदर होता. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी वाघ यांनी पूर्ण केली. त्यामुळेच भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाने जळगाव जिल्हाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दोन वेळा दिली.

…म्हणून उदय वाघ राज्यात आले होते चर्चेत

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमळनेर येथे भाजप पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उदय वाघ यांच्या समर्थकांनी भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांना मंचावर हाणामारी केली होती. या प्रकरणामुळे उदय वाघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -