घरCORONA UPDATEयेरवडा जेलमधून पाठवलेल्या ४ कैद्यांना कोरोनाची लागण, साताऱ्याचा आकडा ७० पार

येरवडा जेलमधून पाठवलेल्या ४ कैद्यांना कोरोनाची लागण, साताऱ्याचा आकडा ७० पार

Subscribe

येरवडा जेलमधून पाठवलेल्या ४ कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून साताऱ्याचा आकडा ७० वर गेला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. या कोरोना विषाणूची बाधा कारागृहातील कैद्यांना देखील होऊ लागली आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहातून साताऱ्यातील कारारागृहात पाठवलेल्या ४ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या कैद्यांच्या संपर्कात येणाऱ्या १५ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यातील आकडा ७७ वर गेला आहे.

४६ कैद्यांपैकी ४ कैदी कोरोनाबाधित

साताऱ्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून कोरोनाबाधितांचा आकडा ७० पार गेला आहे. या रुग्णांमध्ये पुणे येथील येरवडा कारागृहातून ४६ कैदी सातारा कारागृहात पाठवण्यात आले आहेत. याती ४ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे साताऱ्यासह सातारा शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. तसेच जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींना कोरोनाची बाधा

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर फलटणमध्ये आतापर्यंत ४ रुग्ण आढळले आहेत. तसेच एक ६ वर्षाचा मुलगा कोरोनामुक्त व्यक्तीच्या संपर्कात आढळल्याने त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात अधिकच चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबई आणि पुण्यात कोरोनाने विळखा अधिकच घट्ट केला आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी एका रात्रीत ६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९८० वर पोहोचला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ढिसाळ नियोजनाचा फटका : सुविधांअभावी मालेगावात परिचरिकांची गैरसोय 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -