घरताज्या घडामोडीजीपच्या धडकेत चारजण ठार

जीपच्या धडकेत चारजण ठार

Subscribe

गिरणारे गावाकडून मखमलाबादकडे भरधाव जाणार्‍या पिकअप जीप व दुचाकी यांच्यात सोमवारी (दि.१३) झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकासह एकाच कुटुंबातील तीन असे चार व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये ३ वर्षीय मुलाचा समावेश आहे. अपघातानंतर जीपचालक फरार झाला. याप्रकरणी केशव दिवे (रा. सापगाव) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दुचाकीचालक दिलीप नामदेव दिवे (२१, रा. सापगाव), केशव खोडे (३५, तिघेही रा. ओझरखेड), मीराबाई केशव खोडे (३०), अनिल केशव खोडे (३) अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, केशव दिवे यांचे चुलत भाऊ दिलीप दिवे दुचाकीने (एमएच 15, सीएल-2988) गिरणारेकडून ओझरखेडला जात होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे मीराबाई खोडे, केशव खोडे व त्यांचा मुलगा अनिल हे बसलेले होते. त्यांची गाडी मखमलाबाद परिसरात गोशी नाल्याजवळ आली असता समोरून भरधाव आलेल्या पिकअप (एमएच 15-ईजी-9633)ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालकासह तिघे जागीच ठार झाले. अपघातानंतर पिकअपचालक फरार झाला. पुढील तपास म्हसरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे ओझरखेड गावावर मात्र शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -