घरताज्या घडामोडीपुणे : झाडाखाली ठेवलेल्या ४ महिन्याच्या मुलीची आई सापडली

पुणे : झाडाखाली ठेवलेल्या ४ महिन्याच्या मुलीची आई सापडली

Subscribe

चार महिन्याच्या बाळाला झाडाखाली ठेऊन पसार होणारी आई अखेर सापडली आहे.

पुण्याच्या बावधन परिसरात एका चार महिन्याच्या बाळाला झाडाखाली ठेवून अज्ञात महिला पसार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चांदणी चौकात गुरुवारी घडली होती. ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोथरुड पोलिसांनी धाव घेत तात्काळ त्या गोंडस बाळाला ताब्यात घेऊन एका संस्थेकडे सोपवले आहे. मात्र, आज अखेर त्या बाळाच्या आईला शोधण्यात पोलिसांना यश आले असून त्या चार महिन्यांच्या मुलीची आई सापडली आहे.

याकरता गेली होती सोडून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; झाडाखाली चार महिन्याच्या बाळाला सोडून जाणाऱ्या आईचा कालच पोलिसांना फोटो सापडला होता. त्या फोटोच्या मदतीने पोलिसांनी त्या बाळाच्या आईचा शोध घेतला त्यानंतर पोलिसांना ती सापडली. तिच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता मानसिक तणावातून पोटच्या गोळ्याला उघड्यावर सोडून गेल्याचे या महिलेने कबुल केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

नेमके काय घडले?

कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार; पुण्यातील चांदणी चौकात एका लहान मुलीला झाडाखाली सोडून एक महिला निघून गेल्याचे पोलिसांनी समजले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत मुलीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बाळाची प्रकृती सध्या चांगली असून बाळाला एका ससूनमधील संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. दरम्यान, ही बाळाची आईच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.


हेही वाचा – धक्कदायक! चार महिन्याच्या गोंडस मुलीला झाडाखाली ठेवले आणि…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -