घरमहाराष्ट्र1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील फरारी आरोपींना बेड्या, अबू बकर आणि युसूफसह 4...

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील फरारी आरोपींना बेड्या, अबू बकर आणि युसूफसह 4 जणांना अटक

Subscribe

1993 च्या बॉम्बस्फोटातील चार फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अबू बकर, युसूफ भटका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

Mumbai 1993 Blasts Case Accused Arrested: मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटातील चार फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अबू बकर, युसूफ भटका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. नुकतेच एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन मुंबईस्थित साथीदार आणि जवळचा विश्वासू शकील शेख उर्फ ​​छोटा शकील याला अटक केली आहे. आरिफ अबु बकर शेख आणि शब्बीर अबु बकर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एनआयए अधिकाऱ्याने सांगितले होते की, दोघेही मुंबईच्या पश्चिम उपनगरातून डी-कंपनीचे सिंडिकेट चालवत होते आणि ते बेकायदेशीर कारवाया आणि दहशतवादी फंडिंगमध्ये गुंतले होते.

- Advertisement -

पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट चालवणाऱ्या छोटा शकीलविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तो खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे.

- Advertisement -

हेही वाचाः आईची काळजी घेण्यासाठी मोठ्या घराची नव्हे, तर मोठ्या हृदयाची गरज, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -