घरठाणेचिखलाने रोखला दोन तास मुंबई नाशिक महामार्ग; घोडबंदर रोडवरही त्याचा परिणाम

चिखलाने रोखला दोन तास मुंबई नाशिक महामार्ग; घोडबंदर रोडवरही त्याचा परिणाम

Subscribe

मुंबई-नाशिक महामार्गावरती मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या रोडवरती अनोळखी ट्रकमधून चिखल पडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील साकेत ब्रीज जवळ घडली. या चिखलाने तब्बल दोन तास महामार्ग रोखलाच त्याचबरोबर याचा फटका शहरातील अंतर रस्त्यावर बसल्याचे पाहण्यास मिळाले. साकेत ब्रीज पासून कॅडबरी सिग्नल पर्यंत तसेच, घोडबंदर रोडवरती माजिवाडा ब्रीज पासून ब्रम्हांड सिग्नल पर्यंत सुमारे १-तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरती मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या रोडवरती सकाळी साडेसात वाजण्याच्या अनोळखी ट्रक चिखल घेऊन जात होता. ट्रक साकेत ब्रिज जवळ आल्यावर त्यातील चिखल रस्त्यावर आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी वाहतूक पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरल्याने तो रस्त्याच्या एका बाजूला करण्यासाठी एक जेसीबी मशिन, १-रेस्क्यु वाहन व १-फायर वाहन पाचारण केले.तसेच चिखलावरती अग्निशमन दलाच्या फायर वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा स्प्रे मारून व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे मदतीने सुमारे ०२-तासाच्या प्रयत्नानंतर रोडवरील चिखल बाजूला करण्यात यश आले.

- Advertisement -

या चिखलाने महामार्ग रोखून धरला त्याशिवाय मुंबई-नाशिक महामार्गावरती साकेत ब्रीज पासून कॅडबरी सिग्नल पर्यंत तसेच, घोडबंदर रोडवरती माजिवाडा ब्रीज पासून ब्रम्हांड सिग्नल पर्यंत सुमारे १-तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने मुंबई-नाशिक महामार्ग व घोडबंदर रोड आत्ता सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा केला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -