घरमहाराष्ट्रभयंकर! एकाच कुटुंबातील चौघींवर भोंदू मांत्रिकानंच केला बलात्कार

भयंकर! एकाच कुटुंबातील चौघींवर भोंदू मांत्रिकानंच केला बलात्कार

Subscribe

नागपूरातील एकाच कुटुंबात राहणाऱ्या चार महिलांवर भोंदू मांत्रिकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूत बाधा करून आणि त्याचा धाक दाखवत उपचार करण्याच्या नावाखाली भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलीसह तिची आई, मामी आणि आजी अशा एकाच कुटुंबातील चौघींवर सात महिन्यात कित्येकदा बलात्कार केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वयवर्ष ५० असणाऱ्या धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा मांत्रिकाला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, घडलेल्या प्रकरणातील आरोपी हा निवावे पारडीत राहण्यास आहे. याच भागात पीडित महिलेचे कुटुंब राहत असून पीडित मुलीचे वयवर्ष १७ वर्ष असून ती इयत्ता अकरावीत शिकत आहे. २०१८ पासून या मुलीच्या वडिलांची आरोपी निनावे सोबत ओळख होती. यामुळे तो या कुटुंबातील माणसांवर उपचार करण्यासाठी कधी कधी भोंदूगिरीच्या मार्गाने अंगारे, धुपारे करायचा.

- Advertisement -

असा घडला प्रकार

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने कोरोना दरम्यान पीडित मुलीची तब्येत सतत बिघडत होती. त्यामुळे या भोंदू मांत्रिकाने तिला आपल्या दरबारात येण्यास सांगितले. त्याने अंगात आल्याचे नाटक करत पीडितेला भूतबाधा झाल्याचे सांगितले. त्यानंतर अंगारे -धुपारे औषध देऊन रात्रीच्या वेळी निर्जन वस्तीत नेऊन त्याने विधीच्या नावाखाली पीडितेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने मुलीच्या आईवरही बलात्कार केला. यासह पूजेच्या नावाखाली त्याने मुलीच्या मामीच्या घरी जाऊन तिच्यावरही बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे मुलीच्या ६० वर्षीय आजीसोबतही त्याने कुकर्म केल्याचे उघड झाले.

असे सांगितले जाते की, डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत त्या भोंदूंचे दुष्कृत्य सुरू होते. या प्रकरणात चौघींवर बलात्कार करण्यात आला होता. मात्र लाजेखातर त्या एकमेकांना हा घडलेला प्रकार सांगत नव्हत्या. मात्र एकदा तो भोंदू बलात्कार करताना दुसऱ्या महिलेला दिसला. यावेळी ते बघून त्याने आपल्यासह असाच प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर मामी आणि आजीला याबद्दल विचारले असता त्याने त्यांच्यावर देखील अतिप्रसंग केल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पारडी पोलीसात तक्रार दिली असता, आरोपीला अटक करून ८ दिवस झाले तरीही पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराबद्दलची माहिती कोणालाही कळू दिली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -