घरताज्या घडामोडीधक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकलीवर नऊ वर्षांच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

धक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकलीवर नऊ वर्षांच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

Subscribe

चार वर्षांच्या चिमुकलीवर नऊ वर्षांच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने पीडित मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरच्या मागच्या बाजूला नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर संबंधित मुलांवर ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही पिडिता कल्याण पू्र्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या शेजारी हा नऊ वर्षांचा मुलगा राहतो. या मुलाने तीन एप्रिलला दुपारच्या सुमारास खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घरच्या मागच्या बाजूस घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेच्या खासगी भागावर दुखत असल्यामुळे आईने तिच्याकडे चौकशी केली.

- Advertisement -

पीडितीने आईकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर १५ एप्रिलला पीडितेच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरोधात तक्रार दाखल केली. संबंधित मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी दिली आहे. कलम ३७६ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यान्वये संबंधित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी मुलाला अद्यापही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये, असं पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा : South Africa Flood : दक्षिण आफ्रिकेत महापुराचा कहर, पुरामुळे ४०० लोकांचा मृत्यू, तर ४० हजार लोकं बेघर

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -