घरCORONA UPDATE१ ली ते १० च्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ YouTube...

१ ली ते १० च्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ YouTube चॅनेल!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून सुरू करण्यात येणार्‍या ‘टिलीमिली’ मालिकेचे वेळापत्रक २० जुलैला शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार टी.व्ही.वरील ही शाळा २६ सप्टेंबरपर्यंत सकाळी ७.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत भरणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने जिओ चॅनेलही सुरू केले होते.

- Advertisement -

इयत्ता ३ री ते १२ वी साठी जिओ टी.व्ही वर चॅनल सुरू करण्यात आले आहेत. एकूण १२ चॅनल आहेत. या द्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण न होता. विद्यार्थ्यी जीओ टिव्हिवरून अभ्यास सुरू करू शकतात. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने  ४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केली आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

त्याचबरोबर इयत्ता १ ली ते १० वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ युट्यूब चॅनल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्ही वर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत”. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.


हे ही वाचा – चाहत्यांनो सुशांतचा शेवटचा चित्रपट आज ‘या’ वेळेत होणार प्रदर्शित!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -