Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी काँग्रेसमधून आशिष देशमुखांचं निलंबन, कारणे दाखवा नोटीस बजावली

काँग्रेसमधून आशिष देशमुखांचं निलंबन, कारणे दाखवा नोटीस बजावली

Subscribe

काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काँग्रेसची बैठक पार पडली. त्यानंतर या समितीचा अहवाल समोर आला असून आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

तीन दिवसांमध्ये आशिष देशमुख यांनी नोटीशीला उत्तर द्यावं, असं शिस्तपालन समितीने निर्देश दिले आहेत. तसेच उत्तर येईपर्यंत त्यांचं काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महिन्याला एक खोका मिळत असल्याचा दावा, आशिष देशमुख यांनी केला होता. पटोले लवकरच गुवाहाटीला असतील, त्यांना सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका दिला जातो, असा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला होता. त्यामुळे देशमुखांच्या या विधानावर काँग्रेसच्या आजच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीत कारवाई होणार असल्याची चर्चा होती.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक मुंबईत पार पडली. काँग्रेस पक्षाच्या या बैठकीत उल्हास पवार, भालचंद्र मुणगेकर आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मात्र, आता अपेक्षेनुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : बदलापूरमध्ये नागरिकांची दिशाभूल, ATM कार्डची अदला बदली करुन ६७ हजारांचा


 

- Advertisment -