घरमहाराष्ट्रअसे झाले दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, आकडेवारी आली समोर

असे झाले दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन, आकडेवारी आली समोर

Subscribe

गेल्या दहा दिवसापासून राज्यभारत गणरायाच्या आगमनाने आनंद साजरा करण्यात येत होता. आज अखेर बाप्पाल निरोप देण्याची वेळ आली आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दहाव्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत अनेक भाविकांनी गणरायाचे विसर्जन केले यासंबधीत आपत्ती विभागाने आकडेवारी जाहीर केली आहे.

 

- Advertisement -

व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 3 वाजेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 42 गणेश मुर्तींचे विसर्जन केले. तर घरगुती बाप्पाच्या मुर्ती या 2014 इतक्या होत्या आणि एकूण सार्वजनिक गौरी 14 होत्या. याची एकूण आकडेवारी पाहायची झाली तर तब्बल 2160 गौरी आणि गणपीचं वसर्जन करण्यात आलं आहे.

त्याचप्रमाणे, एकूण गणेशमूर्ती विसर्जनात कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी एकूण 634 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये,

- Advertisement -

7 सार्वजनिक गणेश मूर्तींचा तर 617 घरगुती मूर्तींचा समावेश आहे. तसेच,10 गौरींचेही विसर्जन करण्यात आले. दरम्यान मुर्तींचे विसर्जन करतांना कोणत्याही प्रकाराच अपघात घडला नसल्याचे आपत्ती विभागाने सांगितले आहे

हे ही वाचा –

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आज लाडक्या बाप्पाला निरोप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -