घर गणेशोत्सव 2022 गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आज लाडक्या बाप्पाला निरोप

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! आज लाडक्या बाप्पाला निरोप

Subscribe

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि धुमधडाक्यात साजरा झाला आहे. मुंबई, ठाणे. पुण्यासह अनेक जिल्ह्यात श्री गणरायाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. अखेर लाडका बाप्पा दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज अनंत चतुर्थीला भक्तांचा निरोप घेणार आहे. आज राज्यभरात 11 दिवसांच्या गणपती बाप्पांटचे विसर्जन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाने राज्यभरात 10 दिवस उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण अनुभवण्यास मिळाले. मनोभावे लाडक्या बाप्पांची भक्त सेवा करत होते. मात्र अखेर 10 दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत निरोप दिला जाणार आहे.

दरम्यान गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील विसर्जन घाट, चौपाट्या, कृत्रिम तलाव बाप्पाच्या विसर्जनासाठी तयार ठेवण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी विसर्जनादरम्यान काही अनुचित प्रकास घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे.
यात मुंबईत 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्यातील इतर ठिकाणी देखील कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

तब्बल दोन वर्षांनी आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढली जाणार आहे, टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगण लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. दरम्यान गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! हा निनादात सर्वत्र घुमणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी मुंबईसह राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या मुंबईसह राज्यातील विविध चौपाट्या आणि विसर्जनाच्या स्थळी तैनात असतील.

दरम्यान स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्या त्या हद्दीत तैनात असतील, याचबरोबर 3200 अधिकारी, 15,500 अमंलदार, एसआरपीएफच्या 8 तुकड्या, एक आरएएफ, 750 होमगार्ड, 750 प्रशिक्षित कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात असणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबई पालिकेच्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी असलेल्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 73 नैसर्गिक आणि 162 कृत्रिम तलावांवर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व सुविधांनी सज्ज आहे. शुक्रवारी सुमारे 10,000 नागरी कर्मचारी आणि अधिकारी शहरात कार्यरत असतील. दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून गणपती विसर्जन मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. बीएमसीने गणेशोत्सवासाठी 24 नागरी प्रभागांमध्ये 188 नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच विविध विसर्जन स्थळांवर 786 जीवरक्षक नियुक्त केले आहेत.


ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -