घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर.., गिरीश बापटांचं मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर.., गिरीश बापटांचं मोठं वक्तव्य

Subscribe

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०२४ साली पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास मला कोणताही आक्षेप नाही, असं वक्तव्य खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे.

गिरीश बापट यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राजकीय पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा, अध्यक्ष, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर पेच निर्माण होऊ शकतो. त्यांचा रोख अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडे होता. या संघटनेने योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा याचा निर्णय घ्यावा. परंतु देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही, असं गिरीश बापट म्हणाले.

- Advertisement -

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल आणि राजकीय व्यक्तीमत्व आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे भविष्य आहे, असं पत्रात म्हटलं होतं.


हेही वाचा : आपल्या मातीतल्या मराठमोळ्या उत्सवाचं रुपांतर खेळामध्ये झालं तर चुकीचं काय?, प्रताप सरनाईकांचा

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -