घरमहाराष्ट्रतुम्हीही पहाटे पहाटे आला होतात...; महाजनांचा अजित पवार यांना टोला

तुम्हीही पहाटे पहाटे आला होतात…; महाजनांचा अजित पवार यांना टोला

Subscribe

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील पराभव मान्य करत मंत्री महाजन म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात कट प्रॅक्टिस ही मोठी कीडआहे. ही मोठी साखळी आहे. उत्तम डॉक्टर आहेत, पण काही लोकांमुळे ते बदनाम होत आहेत. यासाठी कठाोर कायदा करण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.

 

नाशिकः पहाटे पहाटे तुम्ही आमच्यासोबत शपथ घेतली होती. त्यामुळे बंडखोरांची चिंती करू नका, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना लगावला.

- Advertisement -

नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २२ वा दीक्षान्त समारंभ पार पडला. त्यानंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार हे वारंवार शिंदे गटावर टीका करत असतात. या टीकेला मंत्री महाजन यांनी उत्तर दिले. मंत्री महाजन म्हणाले, अजित पवार तुम्ही गद्दारांची चिंता करू नका. कारण तुम्ही पहाटे पहाटे आमच्या सोबत शपथ घेतली आहे. त्यामुळे गद्दार म्हणण्याचा अधिकार आहे का?. त्या दिवशी मीही तुमच्या सोबत होतो. तसेच आमच्या सोबत आलेले शिंदे गटाचे सर्व आमदार निवडून येतील. त्यांची आम्ही काळजी घेऊ, असा दावाही मंत्री महाजन यांनी केला.

उद्धव ठाकरे निवडणूक घेण्याचे आवाहन करत असतात. त्यावर मंत्री महाजन म्हणाले, आमच्यामुळे शिवसेनेचे १८ खासदार व ५५ आमदार निवडून आले. शिवसेनेने आम्हाला दगा दिला. त्यावेळी आम्ही म्हणालो असतो निवडणुका घ्या. तर तुम्ही घेतल्या असत्या का?. तेव्हा तुम्ही पळून गेलात. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. आता वर्षभरानंतर निवडणुका आहेत. घोडा मैदान दूर नाही.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील पराभव मान्य करत मंत्री महाजन म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात कट प्रॅक्टिस ही मोठी कीड आहे. ही मोठी साखळी आहे. उत्तम डॉक्टर आहेत, पण काही लोकांमुळे ते बदनाम होत आहेत. यासाठी कठाेर कायदा करण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली.

अनिल देशमुख यांना भाजपची ऑफर होती, यावर मंत्री महाजन म्हणाले, निवडणुकीच्या आधी अनिल देशमुख हे भाजपमध्ये येण्यासाठी आग्रही होते. पण आ्म्ही त्यांना घेतलं नाही. तरीही ते निवडून आले. गृहमंत्री झाले. यासाठी त्यांना लकीच म्हणावं लागेल. मात्र त्यांनी लाच मागितली आणि सर्व घोळ झाला. या प्रकरणात त्यांच्याविरोधात खटला सुरु होणार आहे. सध्या ते जामीनावर आहेत. त्यांनी कायदेशीर लढाईकडे लक्ष द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -