घरमहाराष्ट्रनाशिकमहाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले

महाविकास आघाडी सरकारमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले

Subscribe

ओबीसी जागर अभियान बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजनांचे टिकास्त्र

पंचवटी – आघाडी सरकारनेच ओबीसी समाजाला वार्‍यावर सोडले आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेले, अशा शब्दांत माजीमंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले.

ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पंचवटीतील ओबीसी जागरण मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री खासदार भारती पवार, प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा नाशिक प्रभारी आमदार जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, धुळ्याचे महापौर नाना कर्पे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जेष्ठ नेते विजय साने आदी उपस्थित होते.

- Advertisement -

महाजन पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांत आपापसांत समन्वय नसुन, एक पक्ष निर्णय घेतो तर दुसरा पक्ष त्याला विरोध करतो. ओबीसींना आरक्षण मिळावे ही सरकारची मानसिकताच नसल्याचे ते म्हणाले. हे सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरले असून अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले. ते आत्महत्या करत आहेत, परंतू महाविकास आघाडी सरकारतर्फे अद्याप शेतकर्‍यांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, केंद्र शासनाच्या ओबीसींसाठींच्या योजना राबवण्यासाठी आपण व्यापक काम करू. तसेच, ओबीसींच्या समस्या व प्रश्न योग्य त्या मंत्रालयाकडे पोहोचवून त्या सोडवण्यासाठी काम करू.

ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले की, ओबीसींच्या न्याय-हक्कासाठी भाजप ओबीसी मोर्चा कटिबद्ध असून, ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही झोकून देऊ. ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाला आरक्षण देणार नसेल तर छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही टिळेकरांनी केली.

- Advertisement -

माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष केला नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही. म्हणून आरक्षणासाठी ओबीसी समाजाच्या संघटित प्रयत्नांची गरज आहे. आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास हमखास यश येईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केला. आमदार प्रा. फरांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शंकर वाघ यांनी केले. गिरीश पालवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले, तर चंद्रकांत थोरात यांनी आभार मानले.

प्रश्न सोडवणारी नव्हे निर्माण करणारी आघाडी

महाविकास आघाडी आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. कुठल्याही विषयावर केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार नामानिराळे होण्याचा प्रयत्न करते. त्यामळेच समस्या मार्गी न लागता राज्यातील नागरिकांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. थोडक्यात, महाविकास आघाडी सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी प्रश्न निर्माण करतेय, अशी टिका प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -