Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सत्तेसाठी लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे मान डोलवतायेत, पडळकरांचा काँग्रेसवर निशाणा

सत्तेसाठी लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे मान डोलवतायेत, पडळकरांचा काँग्रेसवर निशाणा

न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग

Related Story

- Advertisement -

ओबीसी आरक्षणावरुन भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पडळकर टीका करत असतात यावेळी काँग्रेस नेत्यांवरही निशाणा साधला आहे. कांग्रेसच्या मंत्र्यांविरोधातली तक्रार आता थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकार ओबीसीच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई करत नाही पण आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे तर सत्तेसाठी मंत्री काका-पुतण्यापुढे मान डोलवतायेत असा घणाघात पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवत आहेत. लवकरच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करणार आहे की तुमचे मंत्री किती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग

- Advertisement -

“शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं सरकार किती बहुजनद्वेष्ट आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय..यांना मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये, पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडालीये. ..सत्तेचे वेसन बांधलेले कॉंग्रेसचे लाचार मंत्री काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत. मी लवकरच माननीय सोनिया गांधींना तुमचे मंत्री किती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी प्रेरित होऊन सत्तेत काम करतात असे गोपींच पडळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -