घरमहाराष्ट्रवृक्षारोपणाचे लक्ष्य मात्र संगोपणाकडे दुर्लक्ष

वृक्षारोपणाचे लक्ष्य मात्र संगोपणाकडे दुर्लक्ष

Subscribe

वृक्षलागवडीच्या उपक्रमात कोट्यावधी झाडांची लागवड केली जाते. मात्र, शासकीय यंत्रणांकडून हवे तसे संगोपन केले जात नाही.

राज्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेतला जात आहे. राज्यात यावर्षीच्या वनमहोत्सवाला सुरुवात होणार आहे. या महोत्सवांतर्गत १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य गाठण्यासाठी शासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. वनविभागाच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत, नगरपरिषद, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण यांचा सहभाग असणार आहे. मात्र यातून केवळ वृक्षारोपण होईल, वृक्ष संगोपण होत नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने रोपे मरून जातात. परिणामी वृक्ष लागवडीचा हा केवळ फार्स बनेल, अशी शक्यता आहे.

कोट्यावधी झाडे लागतात, पण संगोपण नाही

गेल्या तीन वर्षांपासून वनक्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्र, खासगी जागेत अशा अनेक ठिकाणी कोट्यवधी झाडांची लागवड दरवर्षी केली जाते. मागील तीन वर्षांच्या तुलनेत वन विभागाकडून लागवड करण्यात आलेल्या झाडांचे संगोपन होते. ही झाडे जगवली जातात. मात्र इतर शासकीय यंत्रणेकडून लागवड झालेल्या झाडांचे संगोपन होत नाही. या झाडांचे संगोपन होत नसल्याने वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुल

- Advertisement -

१३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम फार्स – अतुल देशमुख

जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले की, दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. कोट्यवधी रुपये खर्च करुन सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावली जाते. झाडांची लागवड करत ही झाडे जगवण्याची शपथ घेतात, मात्र प्रत्यक्षात या झाडांचे संगोपन होत नाही. त्यामुळे झाडांची लागवड करूनही फायदा होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -