घरमहाराष्ट्रदुष्काळी दौऱ्यावर शरद पवारांसोबत नातू रोहित; आमदारकीच्या उमेदवारीचे संकेत

दुष्काळी दौऱ्यावर शरद पवारांसोबत नातू रोहित; आमदारकीच्या उमेदवारीचे संकेत

Subscribe

रोहित दादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील, अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार हसत तुझी मागणी झाली, असं रोहित पवार यांना म्हणाले. शरद पवार बीड जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर जात असताना जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार उपस्थित होते. दरम्यान, या दुष्काळी दौऱ्यात अजित पवार यांचे सुपूत्र आणि मावळचे लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार कुठे दिसले नाहीत. तर विधानसभेच्या तयारीत असलेले रोहित पवार मात्र आजोबा शरद पवारांसोबत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या बीड जिल्ह्यात दुष्काळी दौर्‍याला आज, सोमवारी सकाळी आष्टी तालुक्यातील खडकत येथून सुरुवात झाली. याठिकाणी त्यांनी सुमारे अर्धा तास शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न अडचणी जाणून घेतल्या. या वर्षी १९७२ पेक्षा भयानक दुष्काळाची परिस्थिती आहे. पावसाळा आणखीन दोन महिन्याने लागणार आहे. अशावेळी पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा, असे आवाहन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

- Advertisement -

सरकारने सढळ हाताने मदत करावी

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी मी शासनाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सरकारने कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सढळ हाताने पुढे यावे, असेही आवाहन पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना केले. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आमदार उषाताई दराडे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा नेते रोहित पवार, बाळासाहेब आजबे, महेंद्रजी गरजे, शिवाजी राऊत, सतीश शिंदे, मेहबूब शेख यांच्यासह स्थानिक नेते यावेळी त्यांच्या समवेत होते.

सौताडा गावातील छावणीला भेट

स्वामी बहुउद्देशीय सेवा संस्थेने चालवलेल्या छावणीमध्ये प्रामुख्याने एक तक्रार आली की छावणी जवळ जवळ २७ मार्चला सुरु झाली. परंतु अद्यापही छावणीचे अनुदान शासनाने दिलेले नाही. परिणामी व्याजाने पैसे घेऊन छावणी चालवण्याचा प्रसंग छावणी चालकांवर आलेला आहे. यासाठी ९० रुपये दिले जातात हे सुद्धा चाऱ्याचे भाव पाहता कमी आहेत. पाणी दूर अंतरावरून आणावं लागतं ते सगळं पाहता छावणीचा खर्च पाहता तो परवडणारा नाहीये त्यामध्ये वाढ करून देण्याची मागणी ही छावणी चालकांनी शेतकऱ्यांनी केली. दुधाचे दर दोन रुपयांनी कमी झालेत आधीच दुधाचे उत्पादन घटले. शेतकरी वर्गावर हे एक मोठे संकट आले आहे. विम्याचे पैसे मिळाले नाही. फळबागा जळून गेल्या आहेत. त्यासाठी कोणत्या प्रकारचा अनुदान नाही. त्या वाचवण्यासाठी सुद्धा समस्या आहेत. छावणी चालकांनी एक नवीन समस्या सांगितली की टॅग जनावराला लावतात. जनावरांची संख्या अचूक राहावी, त्यामध्ये फेरफार होणे. हा जरी शासनाचा उद्देश असला तरी टॅक लावून अपलोड करणे, हे जिकिरीचे काम मात्र शासनाने त्यासाठी स्वतंत्र व्यक्ती नेमावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -