घरमहाराष्ट्रकोकणातले ‘हार्मोनियमचे घर‘

कोकणातले ‘हार्मोनियमचे घर‘

Subscribe

कोकणात सध्या धडाक्यात गणेशोत्सव सुरू असल्यामुळे वेंगुर्ले-वजराठ येथील सुनील मेस्त्री यांचे घर हार्मोनियम बनविण्याचा जणू कारखानाच बनले आहे.

गणेश चतुर्थीला कोकणात प्रत्येक घराघरात हार्मोनियम ऑर्गनचे सुर घुमतात.या हार्मोनियमचा शोध भारतात लागला असला तरी त्यातील स्वर हे आज ही भारतात बनत नाहीत. जर्मनीसह अन्य देशातून ते जुने स्वर भारतात येतात. कोलकाता आणि मुंबईत त्यावर प्रक्रिया करून मग ते देशात अन्यत्र पाठवले जातात. तसेच या हार्मोनियम करीता लागणारे विविध प्रकाराचे लाकुड परदेशीच आहे. या सर्वांचा मिलाप झाल्यानंतर भारतीय हार्मोनियम बनते. कोकणात सध्या धडाक्यात गणेशोत्सव सुरू असल्यामुळे वेंगुर्ले-वजराठ येथील सुनील मेस्त्री यांचे घर हार्मोनियम बनविण्याचा जणू कारखानाच बनले आहे. भारतीय संगीतात हार्मोनियम ऑर्गन या वाद्याशिवाय संगीत परीपूर्ण होत नाही. आज संगीतामध्ये आधुनिकता आली असली तरी हार्मोनियम वाद्यामुळे जिवंतपणा येतो. त्यात भजन आणि दशावतार हे कोकणी माणसांचे प्राण. त्या दोन्हींसाठी हार्मोनियमची साथ अविभाज्य घटक बनली आहे.

परदेशातून येते लाखूड

हार्मोनियमचा शोध हा भारतीय असला तरी पण हे वाद्य बनविण्याची प्रक्रिया सोपी व सहज नाही. बावीस दिवस ते एक महिन्याचा कालावधी हार्मोनियम बनविण्यासाठी लागतो. हार्मोनियमचे परदेशी बनावटीचे जुने स्वर आणि हार्मोनियमसाठी लागणारे मिचुड प्रकारचे लाकुड तसेच दवेदार लाकूड हे कलकत्याहून अथवा मुंबई येथून मागविले जाते.

- Advertisement -

सूर हा गाभा

हार्मोनियममध्ये वापरले जाणारे स्वर हा गाभा (हार्ट) असतो. स्वर चुकला तर हार्मोनियम एक लाकडी पेटी बनते. त्यामुळे स्वर जुळवीणे ज्याला जमले तोच खरा कारागीर ठरतो. हे स्वर जुळविण्याचे काम गेली चाळिस वर्षे सुनील मेस्त्री करत आहेत. कोणता ही वारसा नसताना केवळ जिद्दीने त्यांनी ही उपजत कला जोपासत आहे. आजपर्यंत त्यांनी तीस हजारांपेक्षा जास्त हार्मोनियम तयार केले आहेत. त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य हार्मोनियम बनवण्याच्या कामात जुंपलेले असतात. त्यांनी बनविलेल्या हार्मोनियमला गोवा, मुंबई, सिंधुदुर्ग येथून मागणी असते.

फोटोओळी-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -