घरमहाराष्ट्रHeat Wave : राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची तीव्र लाट: IMD चा...

Heat Wave : राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची तीव्र लाट: IMD चा सतर्कतेचा इशारा

Subscribe

राज्यात उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. यात येत्या 4 दिवसांत राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपुरात उष्णतेची लाट 46.4 अंशांवर पोहचला आहे. यात पुढील चार दिवस राज्यात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिली आहे.

राज्यात सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होतेय. विदर्भात पारा 40 अंशांवर पोहचल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. तर मुंबईसह इतर राज्यातही पारा चाळीस अंशांच्या पार केला आहे. अशात पुढील 4 दिवस राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने हवामान विभागानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

राज्यासाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर आणि मध्य भरतात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर यंदा एप्रिल महिन्यात देशात उकाड्यान सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आत्तापर्यंत सर्वात उष्ण एप्रिल महिना सुरु आहे. याच विदर्भ, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यातील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली आहे. चंद्रपुरात तापमानाचा पारा 46.4 अंशांवर पोहचला. तर जळगावात 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात 45.4, वर्ध्यात 45.1, यवतमाळमध्ये 45.2, नागपुरात 45.2 तर अमरावतीत 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.

त्यामुळे उष्णतेसोबतच्या वाढत्या आजारांची भीती व्यक्त होतेय. अशा परिस्थिती नागरिकांनी पुढील 4 दिवस गरज असेल तरचं घराबाहेर पडावे असा आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच बाहेर पडताना सोबत पाणी आणि चेहरा झाकेल असा रुमाल सोबत ठेवावा.


money laundering case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; 7 कोटींची मालमत्ता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -