घरमनोरंजनmoney laundering case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; 7 कोटींची मालमत्ता...

money laundering case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; 7 कोटींची मालमत्ता जप्त

Subscribe

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची ७ कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात जॅकलीनच्या 7.12 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचाही समावेश आहे. ईडीने जॅकलीच्या 7 कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केली आहे. या भेटवस्तू आणि मालमत्ता अभिनेत्रीला आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिल्या होत्या.

सुकेशने जॅकलीन फर्नांडिसला 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या महागड्या भेटवस्तू पाठवल्याचं प्रकरणाच्या आरोपपत्रात समोर आलं होतं. तसेच त्याने जॅकलिनच्या कुटुंबियांना १७३००० डॉलर आणि जवळपास २७००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सची आर्थिक मदत केली होती.

- Advertisement -

सध्या आरोपी सुकेश चंद्रशेखर राजकारणी टीटीव्ही दिनकरन यांच्या पाच वर्षे जुन्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. 4 एप्रिलला त्याला ईडीने या प्रकरणात अटक केली आहे.

गेल्या वर्षी गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 215 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी सुकेशला ईडीने अटक केली होती. डिसेंबर 2021 मध्ये जॅकलिनला सुकेश विरुद्धच्या तपासात चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर ती ईडीसमोर हजर झाली. दरम्यान जॅकनीलसोबत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर , नोरा फतेही यांना देखील या प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यामुळे जॅकनील पाठोपाठ कोणत्या अभिनेत्रीवर ईडी धाड पडते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -