Heat Wave : विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

काही दिवसांपूर्वी मान्सून केरळात (Monsoon In Kerala) दाखल झाला होता. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामाना खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मात्र, अद्यापही राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave IN State) कायम आहे. अशातच विदर्भात (Vidarbha) पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

विदर्भात अद्यापही उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवत आहे. जून महिना सुरू झाला असताना देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा बसताना दिसत आहेत. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्रात होणाऱ्या पूर्वमौसमी पावसाचा जोर देखील कमी आहे. मराठवाड्यासह विदर्भातील तापमान ४० अंश सेल्सियसच्या पार आहे.

जून महिना सुरू झाल्यानंतर पाऊस पडेल किंवा तापमान कमी होईल असे वाटत होते. काल नागपुरात ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपुरात ४६.४ अंश तापामानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना येणारा संपूर्ण आठवडा उष्ण तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.

कोकणात ८ ते ९ जून रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर मुंबईत १२ जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, राज्यातील काही भागांत पाऊस पडत असल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. परंतु दक्षिण भारतात ७ जूननंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा : Monsoon Update 2022: पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज