घरताज्या घडामोडीमुंबईत 'या' विभागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

मुंबईत ‘या’ विभागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

Subscribe

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) एफ दक्षिण विभागासह ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद (Water Supply Cut) ठेवण्यात येणार आहे.

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) एफ दक्षिण विभागासह ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद (Water Supply Cut) ठेवण्यात येणार आहे. शिवडी बस डेपोसमोर कमी क्षमतेच्या जलवाहिनीला जास्त क्षमतेची जलवाहिनी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. या दुरूस्तीच्या कामासाठी मंगळवार ७ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार ८ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा पूर्णपणे बंद

- Advertisement -

महापलिकेच्या एफ दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर याभागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, ए, बी, आणि ई या विभागातील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कामामुळे मुंबई शहर उत्तर व दक्षिण परिसर येथील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

अत्यावश्यक काम म्हणून ७ आणि ८ जून रोजी पाणी पुरवठा काही भागांमध्ये बंद तर काही भागांमध्ये कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. नागरिकांच्या दीर्घकालीन सोयीसाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. यामुळे ७ आणि ८ जून रोजी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mask Compulsory : राज्यात सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती लागू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -