घरताज्या घडामोडीराज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा १८ जिल्ह्यांना इशारा

राज्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा १८ जिल्ह्यांना इशारा

Subscribe

राज्यभरात मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, त्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने काही भागांत विश्रांती घेतली.

राज्यभरात मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, त्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने काही भागांत विश्रांती घेतली. त्यानंतर आता पुन्हा राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Heavy rainfall alert in 18 district of maharashtra by imd)

राज्यभरात पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, आज राज्यातील १८ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १८ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे. दरम्यान, बुधवार २७ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात राज्यात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.

गुरुवारनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ११ जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -