घरताज्या घडामोडीकोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, १७ बंधारे पाण्याखाली!

कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच, १७ बंधारे पाण्याखाली!

Subscribe

पाच तासात पाण्याच्या पातळी २३ फुटांनी वाढ झाली आहे.

कोल्हापूरमध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील घरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने गेल्या पाच तासात पाण्याच्या पातळी २३ फुटांनी वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यासह १७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अद्याप जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.

- Advertisement -

तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हतनूर धरणातून ४१६ क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या २ दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.


हे ही वाचा – चीनच्या सैन्याचा लाठया, बांबू, बॅट आणि खिळयांनी भारतीय सैन्यांवर हल्ला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -