Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईतील हिमालय पुलाचे काम युद्धपातळीवर, मार्चअखेरीस सुरू होणार

मुंबईतील हिमालय पुलाचे काम युद्धपातळीवर, मार्चअखेरीस सुरू होणार

Subscribe

सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया मुख्यालय परिसर यांना जोडणारा ‘हिमालय’पूल नव्याने उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च २०२३ अखेर नवीन पूल पूर्णपणे उभारून पादचाऱ्यांसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. या पुलाचे पाच गर्डर चढविण्यात आले असून पुलासाठी पायऱ्यांचा जिना उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर पुलाला जोडून एस्केलेटर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला झाल्यावर या पुलाचा वापर करणाऱ्या हजारो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१४ मार्च २०१९ रोजी हिमालय पुलाचा मोठा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये जिवीत हानीही झाली होती. त्यानंतर सदर पुलाचे काम काही कारणास्तव रेंगाळले होते. मात्र जेव्हापासून राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्तांतर झाले त्यानंतरपासून मुंबईतील विकास कामांना अधिक चालना मिळू लागली आहे.

- Advertisement -

हिमालय पुलाचे अतिशय धीम्या गतीने सुरू असलेले काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या काही महिन्यातच पुलाच्या उभारणीच्या कामांना चांगली गती देण्यात आली आहे. या पुलाच्या उभारणीसाठी आणण्यात आलेले स्टेनलेस स्टीलचे पाच गर्डर तातडीने चढविण्यात आले आहेत.

आता सध्या पुलाचा जिना उभारण्याचे काम सुरू आहे. तर मार्च अखेरपर्यंत पुलाला जोडून एस्केलेटरची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वयोवृद्ध, महिला, दिव्यांग व्यक्ती आदिना जिना चढून जाण्याची गरज भासणार नाही. ३३ मीटर लांब व ४.४ मीटर रुंद हिमालय पुलाच्या बांधकामासाठी पालिका अंदाजे सात कोटी रुपये खर्च करणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : आढावा घेऊनच राजन विचारेंची सुरक्षा कमी केली; ठाणे पोलिसांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र


 

- Advertisment -