घरमहाराष्ट्रपुणेहिंदूराष्ट्र सेनेचा तुषार हंबीरराववर ससून रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न, झटापटीत पोलीस जखमी

हिंदूराष्ट्र सेनेचा तुषार हंबीरराववर ससून रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न, झटापटीत पोलीस जखमी

Subscribe

पुणे – पुण्यातील ससून रुग्णालयात हिंदुराष्ट्र सेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर तीन ते चार जणांनी कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर येत आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवल्याने हल्लेखोरांना रोखण्यात यश आले. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – करणी सेनेच्या शहर मंत्र्याची हत्या, ३ आरोपींना अटक

- Advertisement -

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला तुषार हंबीरराव २५ ऑगस्टपासून ससून रुग्णालयात दाखल आहे. त्याची तब्येत ठीक नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार जणांनी कोयत्यासह ससून रुग्णालयात प्रवेश केला. त्यांनी हंबीरला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला परतवून लावला. या झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून आरोपींचा शोध घेत घेत आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! भांडुपमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; 62 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -