घरमहाराष्ट्रपुणे'मिशन मुंबई'नंतर भाजपचे 'मिशन बारामती', बावनकुळे कन्हेरीच्या मंदिरात फोडणार प्रचाराचा नारळ

‘मिशन मुंबई’नंतर भाजपचे ‘मिशन बारामती’, बावनकुळे कन्हेरीच्या मंदिरात फोडणार प्रचाराचा नारळ

Subscribe

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४५ आखलं आहे. तसंच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकवण्यासाठी भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यादेखील २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान बारामती दौऱ्यावर येणार आहेत.

बारामती – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर, आता भाजपाने ‘मिशन बारामती’ हाती घेतले आहे. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज शरद पवारांच्या बारामतीमध्ये जाणार आहेत. पवार कुटुंबीय ज्या मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडायचे त्याच कन्हेरीच्या हनुमान मंदिरात आज चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाला बजरंगबलीचा आशीर्वाद मिळणार का हे पाहावं लागेल.

हेही वाचा – शरद पवारांच्या ‘बारामती’वर भाजपची नजर; मोदी-शहांनी रणनीती आखली

- Advertisement -

राज्यातील सत्तासमीकरण गेल्या काही दिवसांपासून वेगाने बदलत आहेत. अडीच वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. राज्यातील सत्ता उलथवून लावण्यास भाजपाला यश मिळाले. दरम्यान, भाजपा आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली असल्याची माहिती भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. तसेच, यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या क्षेत्रातही जोर वाढवला असल्याचं ते म्हणाले होते. त्यांच्या या मिशन बारामतीला आजपासून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंकडून खेळी! अंधेरी पूर्वेत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

- Advertisement -

मिशन ४५

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन ४५ आखलं आहे. तसंच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकवण्यासाठी भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यादेखील २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान बारामती दौऱ्यावर येणार आहेत.

हेही वाचा – हिंदूराष्ट्र सेनेचा तुषार हंबीरराववर ससून रुग्णालयात हल्ल्याचा प्रयत्न, झटापटीत पोलीस जखमी

कन्हेरीत करणार श्रीगणेशा

शरद पवार यांचं कुटुंबीय गेली ५५ वर्षे कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडतात. गेल्या ५५ वर्षांत शरद पवार एकही निवडणूक हरले नाहीत. त्याच मंदिरात आज चंद्रशेखर बावनकुळे दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर, ते शरद पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीत जातील. तेथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन विविध गणेशमंडळात बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -