घरमहाराष्ट्रआणि निराशेत 'तो' चढला टॉवरवर

आणि निराशेत ‘तो’ चढला टॉवरवर

Subscribe

आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून एक इसमा क्रेन टॉवरवर चढला असल्याची घटना पिंपरी येथे घडली आहे. क्रेनवर चढून त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

आजारपणामुळे अनेकजण नैराश्यात जातात. नैराश्यात जाऊन आपले जीवन संपवण्याचा विचार अनेकांच्या मनात येतो. बऱ्याच लोकांनी आजाराला कंटाळून आपले जीवन संपल्याच्या घटना समोर येत असतात. आजाराच्या वेदना या असह्य असता यामध्ये HIV सारखा जीवघेणा आजार झाला असल्यावर मानसिक तणाव येतोच. HIV ची लागण असलेल्या अशाच एका व्यक्तीने विवाह ठरत नसल्याने चक्क क्रेनवर जाऊन विवाह करण्याची भावना व्यक्त केली आहे. याघटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित व्यक्तीला तुझा विवाह लावून देतो अस म्हटल्यानंतर तो खाली आला. या घटनेमुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र त्याला आत्महत्या करायची नसल्याचे त्याने खाली उतरल्यावर सांगितले.

नाशिक येथून आला होता

HIV ची लागण असलेला व्यक्ती हा आजच नाशिक येथून पिंपरी-चिंचवड शहरात आला. तो मूळचा कंधार, नांदेड येथील आहे. तो मिळेल ते काम करून पोटाची भूक भागवत आहे. नाशिक येथे १५ दिवस काम केल्यानंतर मिळालेल्या पैशातून तो पिंपरी-चिंचवड शहरात आला. त्याच्या मनात नेहमी विवाह होत नसल्याचे नैराश्य होते. वयाच्या २० व्या वर्षी त्याला HIV ची लागण झाली असल्याचे समजले. त्यामुळे त्याचा विवाह होत नाही. विवाह संबंधी त्याचे म्हणणे घरातील व्यक्ती ऐकून घेत नाही. याच नैराश्यातून त्याने साडेबाराच्या सुमारास रावेत येथील एका ५० ते ६० फुटांच्या मोठ्या क्रेनवर चढून आपले म्हणने ऐकवत होता.’माझा विवाह होत नाही मी HIV ग्रस्त आहे.मला विवाह करायचा असून त्यासाठी मुलगी पहा’ असे त्याने ओरडून सांगितले. अगोदर या व्यक्तीने मद्यपान केले असल्याचे शंका व्यक्त केली जात होती.

दीड तास अथक प्रयत्नानंतर आला खाली

या घटनेमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली घेण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आलं. मला आत्महत्या करायची नव्हती परंतु माझ्या भावना कोणी ऐकून घेत नसल्याने मला हे कृत्य करावं लागल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मोठी सुरक्षा असताना देखील तो क्रेनवर चढल्याने पोलीस देखील हैराण आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -