घरमहाराष्ट्रधाराशिवमधील घाटपिंपरीमध्ये टॉवरवर झेंडा फडकावत डॉ. बाबासाहेबांना अनोखी मानवंदना

धाराशिवमधील घाटपिंपरीमध्ये टॉवरवर झेंडा फडकावत डॉ. बाबासाहेबांना अनोखी मानवंदना

Subscribe

धाराशिव जिल्ह्यातल्या घाटपिंपरी गावात आंबेडकरी अनुयायींनी तर चक्क कित्येक फूट उंच टॉवरवर निळा झेंडा फडकावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना दिली.

देशभरात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. समाजातील विविध घटकांनी, सानथोरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहून त्यांचे स्मरण केले. राज्यभरातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. अनेकांनी बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या घाटपिंपरी गावात आंबेडकरी अनुयायींनी तर चक्क कित्येक फूट उंच टॉवरवर निळा झेंडा फडकावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना दिली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून धाराशिवच्या घाटपिंपरी गावातील आंबेडकरी अनुयायींनी गावातल्या उंच टॉवरवर निळा झेंडा फडकावत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करत अनोख्या पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात आली. कृष्णा अहिरे, कृष्णा धावारे आणि अमोल अहिरे या तरूणांनी आपल्या जीवाची बाजी लावत गावातील हा उंच टॉवर सरसर चढले आणि टॉवरच्या टोकावर निळा झेंडा फडकावला. उंच टॉवरवर निळा झेंडा फडकवत असतांना गावातील हजारो आंबेडकरी अनुयायींनी मोठ्या अभिमानाने आपली मान उंच करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहू लागले आहेत.

- Advertisement -
Bhim-Jayanti-2023-Dharashiv-1
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना घाटपिंपरीमधील ग्रामस्थ

त्याचप्रमाणे येत्या २२ एप्रिल व २३ एप्रिल २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज, संत रोहिदास महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, जेष्ठ वर्गासाठी आरोग्य शिबीर, विद्यार्थी वर्ग साठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा, मिरवणूक, गावातील प्रतिष्ठित नागरिक सत्कार, गावातील विकास कामे, आतिषबाजी व भोजनदान अशा स्वरूपात जयंती होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.

हे ही वाचा: “हे नाणं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या फोटूनं”: महामानवाला चित्रकाराकडून अनोखं अभिवादन…

- Advertisement -

यावेळी समस्त गावकऱ्यांनी घाटपिंपरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात एकत्र येऊन तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोष आणि प्रार्थना करण्यात आली. यावेळी सरपंच आश्विनी विनोद सातपुते, उपसरपंच महेंद्र अहिरे, ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब अहिरे, नवनीत अहिरे, बाबुलाल सुरवसे, सुजीत पाटील, किरण सुरवसे, बाबु अहिरे, दीपक धावारे, बबन अहिरे, सुकशला गायकवाड, माया पवार, शंकर अहिरे, संगोबा अहिरे, कृष्णा अहिरे, अमोल अहिरे आदि मंडळी उपस्थित होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -