Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गृहमंत्र्यांच्या सुरक्षा गार्डचे अपघातात निधन; अनिल देशमुख म्हणाले...

गृहमंत्र्यांच्या सुरक्षा गार्डचे अपघातात निधन; अनिल देशमुख म्हणाले…

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघातात निधन झाले आहे.

Related Story

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय धनराज नारनवरे, असे सुरक्षा गार्डचे नाव असून ते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील सिव्हिल लाईन्स भागात असलेल्या निवासस्थानी कार्यरत होते. बुधवारी रात्री ते मोटरसायकलने कर्तव्यावर हजर राहण्यासाठी घरुन निघाले. मात्र, नांदगाव फाटा परिसरात येताच त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. त्या धडकेत त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटरद्वारे दिली आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे.’

- Advertisement -

ट्रकचालकाच्या शोधासाठी नाकाबंदी

संजय नारनवरे यांचा कोराडी मार्गावरील नांदगाव फाटा येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवला. मात्र, या दरम्यान ट्रक चालक पसार झाला होता. या चालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – शेतकरी आंदोलकांचे आज देशव्यापी रेल रोको आंदोलन


 

- Advertisement -