घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकागदपत्रे बनावट कसली? पडताळणीनंतर सुधाकर बडगुजरांवर दाखल केला गुन्हा

कागदपत्रे बनावट कसली? पडताळणीनंतर सुधाकर बडगुजरांवर दाखल केला गुन्हा

Subscribe

शर्मिष्ठा वालावलकर : नाशिक महापालिका अपहारप्रकरण

एसीबीने माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा बडगुजरांनी केलेला आरोप पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी खोडून काढला आहे. 2016 सालापासून बडगुजरांची उघड चौकशी सुरू होती. चौकशी अंतिम सर्व कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे. त्या पडताळणीनंतरच बडगुजरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अनेक वर्षांपासून कार्यालयात वेळोवेळी चौकशीसाठी बोलविले जात होते. त्यामुळे ते याबाबत पूर्णतः अनभिज्ञ होते, असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यांनाही याची कल्पना होती, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.

महापालिकेतील अपहार व बनावट दस्तऐवजप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची शुक्रवारी (दि.२२) लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालायत चौकशी केली जाणार आहे. एसीबीच्या पथकाने संशयित साहेबराव रामदास शिंदे, सुरेश भिका चव्हाण यांची सोमवारी (दि.१८) सकाळी 11:30 ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत चौकशी करत जबाब नोंदवून घेतले. पुन्हा गरज भासल्यास दोघांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एसीबीकडून रविवारी (दि.१७) रत्री बडगुजर यांचे निवासस्थान, मेसर्स बडगुजर अँड कंपनीच्या कार्यालयात आणि उर्वरित दोन संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. झडतीसाठी एसीबीने 4 पथके नेमली होती.

- Advertisement -

यावेळी ‘एसीबी’च्या पथकास आर्थिक व्यवहारासबंधी काही महत्वाचे कागदपत्रे हाती लागली आहे. त्यांनी चौकशीसाठी समन्स नोटीस देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी काही कागदपत्रे सादर करावयाचे असल्याचे सांगून 8 दिवसांची मुदत मागितली. त्यांना 4 दिवसांची मुदत दिली आहे. ते चौकशीसाठी शुक्रवारी एसीबी कार्यालयात हजर राहतील, असे एसीबीकडून सांगण्यात आले.

या कारणामुळे बडगुजर चौकशीला राहिले गैरहजर

नाशिक पोलिसांनी बडगुजरांची सलग तीन दिवस चौकशी केली होती. मात्र, चौथ्या दिवशी सोमवारी (दि.१८) बडगुजर चौकशीला गैरहजर राहिले. त्यांनी प्रकृती अस्वस्थ्य असल्याचे सांगत मंगळवारी चौकशीसाठी येतो, असे पोलिसांना सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -