घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकागदपत्रे बनावट निघाल्यास जाहीरपणे गळफास घेईन

कागदपत्रे बनावट निघाल्यास जाहीरपणे गळफास घेईन

Subscribe

सुधाकर बडगुजर यांचे खळबळजनक वक्तव्य

बडगुजर अँड बडगुजर कंपनीतून निवृत्ती घेण्याविषयी सादर केलेली कागदपत्रे बनावट निघाल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक कार्यालयात जाहीरपणे गळफास घ्यायला तयार आहोत, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिला.

सोमवारी (दि.18 डिसेंबर) शिवसेनेच्या कार्यालयात सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केवळ सूडाच्या राजकारणातून माझ्यावर कारवाई सुरू आहे. रविवारी (दि.17) सायंकाळी साडेसातला माझ्या दोन्ही बंगल्यांवर पोलिसांनी छापा टाकला. माझ्या 53 वर्षांच्या आयुष्यात माझ्यावर साध्या एनसीचीही (अदखलपात्र गुन्हा) नोंद झालेली नाही. ज्या बडगुजर अँड बडगुजर कंपनीबाबत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, त्या कंपनीचा मी 2006 मध्ये राजीनामा दिला होता. 2013 मध्ये कोर्टात दाखल करण्यात आलेल्या पिटीशनमध्ये या सर्व गोष्टींचा उेख केलेला आहे. मग, अँटी करप्शनला माझ्यापर्यंत पोहोचायला 10 वर्षे का लागले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

यावेळी दत्ता गायकवाड म्हणाले की, राजकारणाचा स्तर अतिशय खाली आला आहे. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अधिवशेनात सांगितले की, सलीम कुत्ता हा 1998 मध्येच मरण पावला. मग हा नवीन सलीम कुत्ता कुठून धरुन आणला? त्याच्या तिघा पत्नींनीसुध्दा सलीम कुत्ताच्या मृत्युबाबत दुजोरा दिला आहे. प्रवीण गेडाम यांनी जी तक्रार दाखल केली ती न्यायप्रविष्ट होती. मात्र, त्याच्या आधारेच कारवाई करण्यात येत आहे, हे अन्यायकारक आहे.

काय म्हणाले सुधाकर बडगुजर?

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव गुन्हा दाखल करताना मला नोटीस का नाही दिली म्युनिसिपल संघटनेचा अध्यक्ष झालो तेव्हा दीपाली सिन्हांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा सुप्रीम कोर्टाच्या सांगण्यावरुन गुन्हा मागे घेतला, मग गुन्हा दाखल का केला माझ्यावर भ्रष्टाचाराचे नव्हे तर आंदोलनाचे गुन्हे ह्युमन राईटस् किंवा सेंट्रल व्हिजिलन्सकडे अन्यायाविरोधात तक्रार करणार 106 पानांची पिटीशन दाखल करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -