घरमहाराष्ट्रमी मराठा आरक्षणविरोधी नाही; अशोक चव्हाण यांनी केले स्पष्ट

मी मराठा आरक्षणविरोधी नाही; अशोक चव्हाण यांनी केले स्पष्ट

Subscribe

ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका मांडली. त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढलो. वेळोवेळी मी मराठा आरक्षणाच्या बाजूनेच भूमिका घेतली आहे. माझ्या सहीचे बनावट लेटर हेड तयार करण्यात आले. या लेटर हेडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आले. या पत्रात मराठा आऱक्षणविरोधी भूमिका मांडण्यात आली. हे पत्र सध्या व्हायरल होत आहे. मात्र माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा हा कट आहे.

मुंबईः मी मराठा आरक्षणाविरोधी नाही. तरीही माझ्या बनावट लेटर हेडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देण्यात आले. या पत्रात मी मराठा आरक्षणविरोधी असल्याची भूमिका मांडण्यात आली होती. हे चुकीचे आहे. उलट माझे मराठा आरक्षणाला समर्थन आहे, असे कॉंग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका मांडली. त्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढलो. वेळोवेळी मी मराठा आरक्षणाच्या बाजूनेच भूमिका घेतली आहे. माझ्या सहीचे बनावट लेटर हेड तयार करण्यात आले. या लेटर हेडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आले. या पत्रात मराठा आऱक्षणविरोधी भूमिका मांडण्यात आली. हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.  माझी राजकीय कारकिर्द संपवण्याचा हा कट आहे.

- Advertisement -

माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. मी कुठे जातोय. कुठे थांबतोय याची माहिती घेतली जात आहे. गेले अनेक दिवस हे सुरु आहे. पोलिसांत याची तक्रार केली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाकडे याचा तपास सोपवण्यात आल्याचे मला पोलिसांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला होता. त्यांनी माझी विचारपूस केली. मी त्यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. मी स्वतः यात लक्ष देईन असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी मला दिले आहे, असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.

माझा विनायक मेटे होईल म्हणजे विनायक मेटे यांचा कसा मृत्यू झाला याचा पोलिसांनी तपास केलाच आहे. मात्र माझ्याबाबतीत गेले काही दिवस जे घडत आहेत. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझी माहिती घेतली जात आहे. माझ्या नावाचे बनावट पत्र व्हायरल करुन माझी बदनामी केली जात आहे. त्यामुळे तशी मी भीती व्यक्त केली आहे. मी याची पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस याचा तपास करतीलच, असेही माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -