घरमहाराष्ट्रIFFI महोत्सावाला पणजीमध्ये सुरुवात

IFFI महोत्सावाला पणजीमध्ये सुरुवात

Subscribe

यंदाचे ४९ वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पणजीमध्ये भरवण्यात आले असून मंगळवारी महोत्सावाला सुरुवात झाली.

यंदाचे ४९ वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पणजीमध्ये भरवण्यात आले असून मंगळवार, २० नोव्हेंबर रोजी या महोत्सावाला सुरुवात झाली. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर यांच्या उपस्थितीत या रंगारंग सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते होणार आहे. इफ्फीची सुरुवात ‘द अ‍ॅस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाने होईल. उद्घाटनावेळी कलाकार सोनू सूद व शिल्पा राव हे शानदार कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.

दिग्गज दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवणार 

ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संध्याकाळी ४.३० वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, प्रसून जोशी, हर्षिता भट, मधूर भंडारकर, सुभाष घई, अरजीत सिंग, रमेश सिप्पी यांची उपस्थितीदेखील लाभणार आहे. ‘द अ‍ॅस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाची टीमदेखील यावेळी उपस्थित असेल. यात दिग्दर्शक ज्युलियन लँडीस, चित्रपटाचे मुख्य अभिनेते जोनाथन र्‍हिस मियर्स, मुख्य अभिनेत्री जॉली रिचर्डसन, अभिनेत्री जुलिया रॉबिन्सन, अभिनेत्री मॉर्गन पोलानस्की, अभिनेते निकोलस हाव यांचा समावेश असणार आहे. इफ्फीची तयारी पूर्ण झाली असून कलाकार दाखल होण्यास सुरूवात झाली आहेत.

- Advertisement -

इफ्फीत एकूण २१२ चित्रपट दाखवणार

पणजी शहराच्या प्रवेशव्दारावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. याशिवाय स्टॉल्स उभारण्याचेदेखील काम सुरु असून राजधानी सध्या विद्युत रोषणाईने झगमगून गेली आहे. इफ्फीत यंदा एकूण २१२ चित्रपट दाखवण्यात येतील. ‘वर्ल्ड पॅनोरमा’ विभागात एकूण ६७ चित्रपट असून यात ऑस्करसाठी नामांकित करण्यात आलेल्या तब्बल १५ चित्रपटांचा समावेश आहे. यंदा इस्त्रायली अभिनेते डॅन वॉलमॅन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रेट्रोस्पेक्टीव्ह ऑफ लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड विभागात डॅन वॉलमॅन यांचे सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून मिळाली.

‘इंडो इस्त्रायली को प्रोडक्शन’ कार्यशाळा

फोकस कंट्री इस्त्रायल असून इस्त्रायलचे ख्यातनाम अभिनेते अ‍ॅलन अबाउटबॉल इफ्फीत विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. या विभागात एकूण दहा चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. विभागाची सुरूवात दिग्दर्शक अवि नेशर यांच्या ‘द अदर स्टोरी’ या चित्रपटाने होईल. २२ नोव्हेंबर रोजी ‘इंडो इस्त्रायली को प्रोडक्शन’ कार्यशाळा होईल. यंदा प्रथमच स्टेट फोकस हा विशेष विभाग असणार आहे. स्टेट फोकस ‘झारखंड’ राज्य असून इफ्फीत २४ नोव्हेंबर रोजी झारखंड दिवसही साजरा करण्यात येणार आहे. या विभागात ‘डेथ इन द गुंज’, ‘रांची डायरीज’, ‘बेगम जान’ तसेच अन्य चित्रपट दाखविण्यात येतील.

- Advertisement -

ओपन एअर स्क्रिनिंगद्वारे क्रीडा बायोपिक्स

महोत्सवात ओपन एअर स्क्रिनिंगदेखील असणार आहे. खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा बायोपिक्स विभागही ठेवण्यात आला असून यात ‘गोल्ड’, ‘भाग मिल्का भाग’, ‘मेरी कोम’, ‘1983’, ‘महेंद्र सिंग धोनी अनटोल्ड स्टोरी’ व ‘सूरमा’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. युनेस्को गांधी मेडल विभागात युनेस्कोच्या विचारधारेवर आधारित व प्रतिष्ठित युनेस्को पुरस्कार प्राप्त दहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

वाचा : यंदाच्या ‘IFFI’ फेस्टिवलमध्ये १० मराठी चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -