घरमहाराष्ट्रकोकणातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा

कोकणातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा

Subscribe

- अपर पोलीस महासंचालकांचे आदेश, - गणेशोत्सवापूर्वी काळजी घेण्याच्या सूचना

मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष म्हणजे, या काळात मुंबई आणि आसपासहून कोकणात जाणार्‍या चाकरमन्यांची संख्या ही अधिक आहे. मात्र सध्या येथील रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाल्याने राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात जाणार्‍या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता गुरुवारी मंत्रालयात वाहतूक पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलविण्यात आली होती.

या बैठकीत गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्‍या नागरिकांसाठी मुंबई गोवा महामार्ग तसेच पुणे व कोल्हापूरवरून जाणार्‍या मार्गांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात आदेश पोलीस महासंचालक विनय कोरगावकर यांनी दिले आहेत. यामुळे सध्या तरी चाकरमान्यांना दिलासा मिळाला असून गणेशोत्सवापर्यंत येथील परिस्थिती सुधारेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

गणेशोत्सव काळात कोकणात जाणार्‍या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुवारी विविध यंत्रणांची आढावा बैठक कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना दिल्या. वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील, पोलीस अधीक्षक संजय शिंदे, दिगंबर प्रधान, मिलिंद मोहिते यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी कोकण मार्गावरील वाहनांमुळे वाहतूक थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने संपर्कात रहावे. तसेच स्थानिक पोलिसांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महामार्ग पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कोरगावकर यांनी आज येथे दिले.

कोकणात जाण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गाबरोबरच कोल्हापूर, पुणे व पाली मार्गे जाता येते. या मार्गावर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावी. मुंबई -गोवा महामार्गावर ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, तेथे विशेष लक्ष द्यावे व त्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करावी. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने चालते. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे या महिनाअखेरपर्यंत बुजविण्यात यावेत. तसेच या मार्गावर 29 ते 31 ऑगस्ट या काळात चोवीस तास खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक सामग्रीसह मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -