घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळे ५ दिवसांत ८ हजार हेक्टरचे नुकसान, या तालुक्यात सर्वाधिक

नाशिक जिल्ह्यात अवकाळीमुळे ५ दिवसांत ८ हजार हेक्टरचे नुकसान, या तालुक्यात सर्वाधिक

Subscribe

नाशिक : जिल्हयात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने जिल्हयातील ८०७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ४३७ गावांना अवकाळीचा तडाखा बसला असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या २१ हजार ७५० इतकी आहे. जिल्हा प्रशासन आणि कृषी सहाय्यकांच्या मदतीने पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. जिल्हयात १५ ते १९ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. तर काही भागात गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसला असून अनेक भागात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हयात पेठसह नांदगाव, नाशिक, सुरगाणा कळवण, भागात गारपीटिने तडाखा दिला. ढगाळ वातावरणाने द्राक्षबागांवर गारांच्या तडाख्याने तडे गेले आहेत. कांदा, गहु, द्राक्ष आंबा आदी पिके भुईसपाट झाली आहेत.

- Advertisement -

प्राप्त आकडेवारीनुसार पेठ, नांदगाव, निफाडमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतातील पिकांच्या सर्‍यांमध्ये गारांचा खच पडल्याचे पाहावयास मिळाले. गेल्या दोन आठवडयांपासून जिल्हयात अवकाळीचा तडाख बसत असून आधीच शेतमालाला भाव नाही त्यात आस्मानी संकट यामुळे शेतकरयांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. अद्याप याच नुकसानीचे पंचनामे होत नाही तोच २४ मार्चपासून पुन्हा अवकाळीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकरी धास्तावला आहे. जिल्हयात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून ३५५६ हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले तर १५९५ हेक्टरवरील गहु पिकाचे नुकसान झाले आहे.

पिकनिहाय झालेले नुकसान (नुकसान हेक्टरमध्ये)

कांदा : ३५५६.८६
गहु : १५९५.७२
भाजीपाला : ४३६.२०
द्राक्षे : ७८२.६७
आंबा : १०३४.३०
डाळींब : ३५.00
कांदा रोपे : ५१०.00
टोमॅटो : १४.00
हरभरा : ७५.00

- Advertisement -
तालुकानिहाय नुकसान  (हेक्टर)

नांदगाव : २४४३.१०
कळवण : ८३२.३०
देवळा :२४४.५०
दिंडोरी : ४२.00
नाशिक : ३८.६०
त्रयंबकेश्वर : ४०.२५
पेठ : १५८१.७६
इगतपुरी : ८७.00
निफाड : १५१४.५०
सिन्नर : ८.५०
चांदवड : ५०५
येवला : ५०१.५०
एकूण : ८०७९.१५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -