घरमहाराष्ट्र'आमचं खत चांगलं आहे'; आदित्य यांचा शरद पवार यांना टोला

‘आमचं खत चांगलं आहे’; आदित्य यांचा शरद पवार यांना टोला

Subscribe

'आमचे खत चांगलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र्र हिरवागार आणि भगवा होणार' अशी प्रतिक्रिया देत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्या टिकेला उत्तर दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या शिवसेनाभाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘आमचे खत चांगलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र्र हिरवागार आणि भगवा होणार’ अशी प्रतिक्रिया देत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी अंधेरी मरोळ येथे पालिकेच्या मैदानात झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आदित्य ठाकरे माध्यमाशी बोलत होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत १ हजार १०० नागरिकांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी अकराशे झाड लावण्याचा उपक्रम पार पडला.

काय म्हणालेत नेमकं आदित्य ठाकरे 

‘आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगलं आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे’, असे आदित्य ठाकरे म्हणालेत. तसेच ‘एका खासगी वृत्त पत्राने केलेल्या सर्वेवर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य करत माझा सर्वेवर विश्वास नाही. आम्ही काम करतो. तसेच जनतेचे आम्ही आशीर्वाद घेत फिरतो. जेव्हा सत्ता असते तेव्हा लोकांची कामे करणे गरजेच असतं.
आम्ही लोकांचे आशीर्वाद घेत फिरतो. त्यामुळे निवडणूका येतील तेव्हा निवडणुकीवर बोलू’, असे आदित्य म्हणालेत.

- Advertisement -

काय म्हणाले होते शरद पवार 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर वाढलंय आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फोडाफोडी होत आहे. नेते फोडण्यासाठी सरकारी एजन्सीचा वापर केला जात असून विरोधी आमदारांना ईडीद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच स्वत: मुख्यमंत्री देखील आमदारांना फोन करत आहे’, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला होता.


हेही वाचा – मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करताहेत – पवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -