घरमहाराष्ट्रMaha Politics : उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना नेते पेंगले, भाजपाकडून व्हिडीओ...

Maha Politics : उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना नेते पेंगले, भाजपाकडून व्हिडीओ व्हायरल

Subscribe

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. परंतु, लोकसभेच्या तारखा जाहीर होण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नेतेमंडळींसह दौरे करत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे नेत्यांच्या सभा होत आहेत. अशाच एका सभेतील व्हिडीओ आता भाजपाकडून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना संजय राऊत, अंबादास दानवे पेंगलेले दिसत आहेत. (Leaders fell asleep while Uddhav Thackeray speech was going on, video viral from BJP)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : महायुतीत डोकेदुखी वाढली, मुख्यमंत्री शिंदे चार जागांसाठी कमालीचे आग्रही

- Advertisement -

राज्यातील जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यातील हिंगोली जिल्ह्यातील उमरखेड येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अंबादास दानवे हे उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना पेंगत असल्याचे पाहायला मिळाले. तर काही नेते डोळे बंद करून बसल्याचे, तर काही जांभया देताना पाहायला मिळाले. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर आता हा व्हिडीओ भाजपा आयटी सेलकडून व्हायरल करण्यात येत आहे.

भाजपा आयटी सेलच्या पल्लवी सीटी यांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण चालू असतानाच व्यासपीठावर पेंगणाऱ्या आणि जांभया देणाऱ्या संजय राऊत, अंबादास दानवे आणि आमदार भास्कर जाधव यांचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्स ठाकरे गटाला ट्रोल करत आहेत. पल्लवी सीटी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, “उद्धव ठाकरे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातले एक उत्तम वक्ते आहेत. जगातील सर्वोत्तम डॉक्टर, जगातील सर्वोत्तम माजी मुख्यमंत्री, जगातील सर्वोत्तम वक्ता” असे लिहित टोला लगावला आहे.

- Advertisement -

भाजपाला महाराष्ट्रात ‘उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस’ असे कठपुतलीच्या तालावर नाचणारे सरकार हवे होते. परंतु, असा कठपुतलीचा खेळ माझ्याकडून होत नव्हता. त्यामुळे ’मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’चा नारा देत महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आले. दुसऱ्याच्या संपत्तीवर दरोडा टाकून स्वत:ची संपत्ती दाखवणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत उमरखेड येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पण याच सभेतील हा व्हिडीओ भाजपा पदाधिकारी पल्लवी सीटी यांनी शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -