घरमहाराष्ट्रIrshalwadi Landslide : इर्शाळवाडी बचाव कार्य सुरू; अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी बचाव कार्य सुरू; अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Subscribe

रायगड | इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला असून 98 लोकांना वाजवण्यात यश आले आहे. रायगडमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले होते. यानंतर आज सकाळी 6.30 वाजता पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. इर्शाळवाडी पुन्हा पाऊस सुरू झाला असलल्यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहेत.

रायगड जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. खालापूर जवळील इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच  एनडीआरएफ पथकाने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केली. यात 16 लोकांचा मृत्यू झाला असून 98 लोकांना वाजवण्यात एनडीआरएफच्या पथकांना यश आले आहे. तसेच अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याशिवाय मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश बाल्दी बुधवारी मध्यरात्रीच घटनास्थळी पोहचले होते. मध्यरात्रीपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. गुरुवारी सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत यंत्रणांना सूचना दिल्या.

हेही वाचा – Irshalwadi landslide : मुसळधार पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 16 जणांचा मृत्यू, 98 जणांना वाचवलं

- Advertisement -

मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत

दरम्यान, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी नेत्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर या दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्यात येत आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -