घरCORONA UPDATEसहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक जारी

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक जारी

Subscribe

तंत्रज्ञान कौशल्य आणि समाज माध्यमांचे मनोरंजक पद्धतीने ज्ञान देण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी शिक्षकांना पर्यायी वेळापत्रकाद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी घरबसल्या याचा वापर करू शकतात.

कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या पालक आणि शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमांद्वारे योग्य तऱ्हेने घरीच गुंतवून ठेवण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील (इयत्ता सहावी ते आठवी) विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ( एनसीईआरटी) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक विकसित केले आहे.

तंत्रज्ञान कौशल्य आणि समाज माध्यमांचे मनोरंजक पद्धतीने ज्ञान देण्यासाठी कसा उपयोग करता येईल याविषयी शिक्षकांना पर्यायी वेळापत्रकाद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी घरबसल्या याचा वापर करू शकतात. मोबाईल, रेडिओ, दूरदर्शन, एसएमएस आणि विविध समाज माध्यमांचा याकामी उपयोग करता येईल. बर्‍याच जणांच्या मोबाइलमध्ये इंटरनेट सुविधा असू शकत नाही किंवा व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, गूगल इत्यादी समाज माध्यमांची विविध साधने कशी वापरायची हे माहिती नसते. मात्र, हे वेळापत्रक या साधनांच्या वापराबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करेल जे नंतर पालक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे किंवा व्हॉईस कॉलद्वारे मार्गदर्शन करतील. लवकरच नववी ते बारावी आणि त्यांचे विषय भाग या वेळापत्रकांतर्गत येणार आहेत. हे वेळापत्रक दिव्यांग मुलांसह सर्व मुलांची आवश्यकता पूर्ण करेल ऑडिओ पुस्तके, रेडिओ कार्यक्रम आणि व्हिडिओ कार्यक्रमांचा यात समावेश केला जाईल.

- Advertisement -

अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकातून घेण्यात आलेल्या संकल्पना किंवा धड्याच्या संदर्भात या वेळापत्रकात  मनोरंजक आणि आव्हानात्मक गोष्टी अंतर्भूत असतील. या वेळापत्रकात प्रत्येक आठवड्यानुसार अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे. कला शिक्षण, शारीरिक व्यायाम, योग, पूर्व-व्यावसायिक कौशल्ये इत्यादी अनुभवात्मक शिक्षण उपक्रम देखील समाविष्ट आहेत. या वेळापत्रकात सारणी स्वरूपात वर्गनिहाय आणि विषयवार अभ्यासक्रमाची मांडणी केली आहे. या वेळापत्रकात हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या चार भाषांशी संबंधित अभ्यासक्रम समाविष्ट आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमधील ताणतणाव आणि चिंता कमी करण्यासाठीच्या धोरण निश्चितीलाही हे वेळापत्रक मदत करते. या वेळापत्रकात भारत सरकारच्या ई-पाठशाला, एनआरओईआर आणि डीआयडीएचएसए पोर्टलवर उपलब्ध आहे. एससीईआरटी आणि एसआयई, शिक्षण संचालनालय, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती, सीबीएसई, राज्य शाळा शिक्षण मंडळे इत्यादींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे वेळापत्रक प्रसारित करण्यात येणार आहे.

शिक्षणाचे होणार मापन 

शिकलेल्या गोष्टी आणि संकल्पनांचे मापन करण्यात येणार आहे. हे मोजमापन करण्याचा हेतू म्हणजे शिक्षक किंवा पालकांना मुलांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करता यावे आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाणे सुलभ व्हावे हा आहे. शिक्षणाच्या फलितावर आधारित या वेळापत्रकाची मांडणी केली असल्यामुळे मुले त्यांच्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात पाठ्यपुस्तकांचा वापर करीत कोणत्याही संसाधनातून ते साध्य करू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -