घरमहाराष्ट्रशरद पवार यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकरची; नितेश राणेंची प्रतिक्रिया

शरद पवार यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकरची; नितेश राणेंची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘लवकरच तुमचा दाभोलकर होणार’ म्हणत ट्विटरच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याला धमकी आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी भाजपाचे खासदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शरद पवार यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे.

नितेश राणे म्हणाले की, शरद पवार आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या आणि आमच्या भूमिका असो किंवा त्यांचे काही विचार आम्हाला पटत नसले तरी या राज्यामध्ये कोणालाही त्रास होणार नाही एवढी काळजी आमचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली. शेवटी काय हे उद्धव ठाकरेंचे सरकार नाही, महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे शरद पवार यांची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकरची आहे. (It is our government’s responsibility to take care of Sharad Pawar; Nitesh Rane’s reaction)

- Advertisement -

मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही
नितेश राणे यांना संजय राऊत यांना धमकी आल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आता मच्छर मारण्यासाठी काही कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाच्या खालती थोडा बुट हलवला तरी मच्छर मरते. त्यामुळे संजय राऊत यांना धमकी आली तरी काही विषय नाही. संजय राऊत यांचा जो भाऊ सुनील राऊत यांना धमकी कोणाकडून आली हे विचारा, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.

हेही वाचा – शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

- Advertisement -

दरम्यान, शरद पवार यांना ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या ट्विटर हँडलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे ट्विटर हँडल कोण चालवतं याची अद्याप माहीत स्पष्ट होऊ शकलेली नाही. मात्र या प्रकरणाचं गांभीर्य पाहून लगेचच मोठा पोलीस बंदोबस्त शरद पवार यांच्या घराबाहेर आणि मोदी बाग परिसरात तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -