पालिका सभागृहात २४१ नगरसेवकांना बसण्याची होणार अडचण, पालिका प्रशासनाला करावी लागणार बसण्याची व्यवस्था

Municipal Corporation processes 100 percent waste garbage Carbon footprint will be reduced by 20 percent

मुंबई महापालिकेत (BMC) नगरसेवकांची संख्या २२७ आणि ५ नामनिर्देशित नगरसेवक अशा २३२ जणांना पालिका मुख्यालयातील सभागृहात बसण्यासाठी सध्याची आसन व्यवस्था ही अगोदरच कमी पडत होती. आता तोंडावर आलेल्या पालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवून २२७ वरून २३६ एवढी होणार आहे. त्यामध्ये आणखीन ५ नामनिर्देशित नगरसेवकही असणार आहेत. त्यामुळे एकूण २४१ नगरसेवकांना पालिकेच्या इंग्रजकालीन जुन्या सभागृहात बसण्यासाठी जागा अपुरी पडणार असल्याने मोठी अडचण होणार आहे.

त्यामुळे एकीकडे निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसरीकडे पालिका सभागृहात वाढीव नगरसेवकांच्या बसण्याची व्यवस्था करण्याकजी तयारी पालिका प्रशासनाला करावी लागणार आहे. विशेषतः नगरसेवकांच्या आसनांची संपूर्ण व्यवस्था पाहणाऱ्या व पालिकेचा प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या चिटणीस विभागासामोर मोठे आव्हान असणार आहे. जर वाढीव ९ नगरसेवकांची आसनांची व्यवस्था प्रशासनाने न केल्यास त्यांना एकमेकांच्या बाजूला खेटून बसावे लागणार आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण होऊन त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र शासनाने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या आसनव्यवस्थेचा काहीच विचार न करता परस्पर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आता पालिका प्रशासनाला या वाढीव नगरसेवकांच्या आसनांची व्यवस्था करणे भाग पडणार आहे. अन्यथा पालिका प्रशासन, चिटणीस विभाग यांना नवीन नगरसेवकांच्या व त्यांच्या पक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
त्यासाठी पालिकेला सभागृहातील महनीय व्यक्तींचे दोन ठिकाणी उभारलेले अनेक पुतळे एका बाजूला उचलून ठेवावे लागतील. तर थोडीफार जागा उपलब्ध होईल. दुसरे म्हणजे साउंड सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी खूप मोठी जागा वापरली जात असल्याने त्याला सभागृहाच्या गॅलरीत बसविणे.

तर आणखीन जागा उपल्बध होऊ शकणार आहे. तसेच, सभागृहाच्या आवारातील जागा सभागृहात समाविष्ट करून घेतल्यास सभागृहातील जागा वाढून नवीन नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था निर्माण करता येईल. त्याचप्रमाणे, कोविड काळात पालिकेच्या काही सभा या राणी बागेतील भव्य नाट्यगृहाच्या जागेतही यापुढील पालिका सभा घेणे उचित ठरेल. त्या ठिकाणी राणी बागेच्या आवारात नगरसेवकांच्या वाहनांसाठी पुरेशी जागाही उपलब्ध आहे. या सर्व पर्यायांचा विचार पालिकेला करावा लागणार आहे.

महापालिकेच्या वाढलेल्या सदस्यांची तथा प्रभागांची आकडेवारी

सन १८७२ : एकूण ६४ सदस्य ( ३२ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १८८२ : एकूण ७२ सदस्य( ३६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९२२ : एकूण १०६ सदस्य (७६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९२८ : एकूण १०८सदस्य ( ७६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९३१ : एकूण ११२ सदस्य (८६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९३८: एकूण ११७ सदस्य (१०६ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९५० : एकूण १३५ सदस्य ( १३१ निवडणुकीत निवडून आलेले,उर्वरीत शासनाने नेमणूक केलेले)

सन १९६३: एकूण १४० सदस्य (एक सदस्य प्रभाग: सर्व सदस्य निवडणुकीतून निवडून आलेले)

सन १९८५ : एकूण १७० सदस्य

सन १९९२ : एकूण २२१ सदस्य

सन २००२ : एकूण २२७ सदस्य

सन २०२२ : एकूण २३६ सदस्य


हेही वाचा : चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार