ठाणेकरांच्या पुढच्या 2 पिढ्याही क्लस्टर पाहू शकत नाहीत, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला टोला

झोपडपट्टी पुनर्विकास बंद पडला

Jitendra Awhad

ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत अधिकृत इमारतींना सहभागी होण्यासाठी सक्ती करणारा कायदा राज्य सरकारने केलाय. तसेच या योजनेत सहभागी न झाल्यास एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली होती. याबाबतीत प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने माघार घेतली आणि विकास कामांना परत एकदा सुरुवात झाल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

हेच क्लस्टर संपूर्ण ठाण्यात पसरले आहे आणि ह्याच क्लस्टर अंतर्गत विविध पक्षातील नगरसेवकांच्या गळ्याशी फास आणून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे काम सुरु झाले आहे. अर्थात, कोणी काहिही म्हणो… आजच्या जिवंत असलेल्या दोन पिढ्या सोडूनच द्या. त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांना क्लस्टर बघायला मिळालं तर नशीब त्यांचं, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शिंदे सरकारला टोला लगावला.

100 एकर मोकळ्या जमिनीवर लोढा आणि रुस्तमजी 20 वर्षे ईमारती बांधू शकले नाहीत. तर क्लस्टर कस काय होणार पुढच्या 50 वर्षांत?, क्लस्टरमुळे झोपडपट्टी पुनर्विकास पूर्णपणे बंद असून स्वप्न सत्यात उतरतील तेवढीच दाखवायची असतात. जनता मूर्ख नसते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.


हेही वाचा : क्लस्टर योजनेतील अधिकृत इमारतीबाबतचा संभ्रम दूर