घरक्राइमMunawar Faruqui: बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीसह 14 जणांवर गुन्हा दाखल

Munawar Faruqui: बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीसह 14 जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई : बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीनपत्र गुन्हा असल्याने नोटीस देऊन सर्व आरोपींना सोडण्यात आलं आहे. फोर्ट परिसरातल्या एका हुक्का पार्लरवर समाजसेवा शाखेनं धाड टाकली होती. या प्रकरणातील आरोपी बेकायदेशीररित्या हुक्का पीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा विजेता मुनव्वर फारुकी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या एका हुक्का पार्लरवर समाजसेवा शाखेने छापा टाकला. हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, त्यानंतर त्यांनी छापेमारी केली होती. या हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसह निकोटीनचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्याने हुक्का पार्लरवर त्यांनी छापा टाकला. हुक्का पार्लरमधून पोलिसांनी 4400 रुपये रोख आणि हुक्क्याचे 9 पॉट्स जप्त करण्यात आले आहेत. या पॉट्सची किंमत जवळपास 13 हजार 500 रुपये आहे. या दरम्यान मुनव्वर फारुकीसह 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पण जामीनपत्र गुन्हा असल्यानं मुनव्वरला नंतर सोडण्यात आलं. या प्रकरणी अद्याप मुनव्वरने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – ED Seizes Crores : वॉशिंग मशिनमध्येच सापडले 500 च्या नोटांचे बंडल; ईडीच्या छापेमारीत अडीच कोटी जप्त

चौकशीअंती सुटका

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ट परिसरातील हुक्का पार्लरवर छापा टाकल्यावर ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकी आणि इतर 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते. छापेमारीत 4,400 रुपये रोख आणि 13,500 रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं कायद्याच्या कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुनव्वर याआधीही वादात

मुनव्वर नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 2021 मध्ये इंदूरमध्ये स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान भगवान रामाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात त्याने सुमारे 35 दिवस तुरुंगात काढले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही काही प्रकरणांमुळे मुनव्वर चर्चेत राहिला.

हेही वाचा – Sadanand Date : सदानंद दाते NIA चे महासंचालक; केंद्राचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यावर विश्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -